Skip to content Skip to footer

प्रदूषणाच्या प्रश्नावर ‘गो ग्रीन’चं उत्तर, महिलांच्या स्टार्टअपला नाशिककरांचा प्रतिसाद

Click on Below Link to Read More about News18 Lokmat Nashik

प्रदूषणाच्या प्रश्नावर ‘गो ग्रीन’चं उत्तर, महिलांच्या स्टार्टअपला नाशिककरांचा प्रतिसाद

नाशिक, 8 ऑक्टोबर : शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी नाशिकच्या हिना शहा,रुची भाटिया आणि श्रद्धा मढय्या या तीन महिलांनी एकत्र येत ‘गो ग्रीन कॅब ‘ सर्व्हिस सुरू केलेली आहे. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी जवळपास वर्षेभरापूर्वी आपल्या या व्यवसायाला सुरुवात केली होती. शहरात वाढता प्रदूषणाचा धोका लक्षात घेता त्यांनी इलेक्ट्रिक कारने प्रवाशांना सेवा देण्याचा विचार केला आणि त्यांचा हा प्रयत्न यशस्वी देखील झाला आहे.

एक इलेक्ट्रिक कार पासून सुरू झालेला व्यवसाय आता 17 इलेक्ट्रिक कारवर आला आहे. तर त्यांच्या या व्यवसायामुळे 30 हून अधिक तरुणांना रोजगार देखील मिळाला आहे. आपल्या व्यवसायासोबत प्रवाशांचे ही हीत लक्षात घेतले जात आहे. प्रवाशांना चांगल्या दर्जाची सेवा कशी दिली जाईल याचा नेहमीच या तीन ही महिला विचार करत असतात. जगात होणारे प्रदूषण हे कारखान्यापेक्षा जास्त वाहनांतून होते. त्यामुळे संपूर्ण जग हे ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला सामोरे जात असून त्याचे अनेक दुष्परिणाम निसर्गातील प्रत्येक घटकाला सोसावे लागतात. त्यामुळे नाशिकच्या महिलांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

नाशिकमध्ये पहिलाच प्रयोग

हिना शहा, रुची भाटिया आणि श्रद्धा मढय्या यांनी सुरू केलेला हा ‘गो ग्रीन कॅब ‘ सर्व्हिस उपक्रम नाशिकमध्ये पहिलाच आहे. विशेष म्हणजे या कार मधून प्रवास करताना तुमचा प्रवास हा सुखकर होणार आहे. तसेच त्यांनी इतर कारच्या तुलनेत 20 टक्के कमी भाडे ठेवले आहे. त्यामुळे जर तुम्हाला इतर कारला 200 रुपये मोजावे लागणार असतील तर या कारने 180 रुपयात तुमचा प्रवास होईल. सर्व सामान्य नागरिकांना परवडणार आहे. शिवाय तुम्ही प्रवास करत असलेल्या वाहनातून कोणतही प्रदूषण होणार नाही. त्यामुळे पर्यावरणाला ही तुमची चांगली मदत होणार आहे.

अशी करा ‘गो ग्रीन कॅब ‘ बुक

तुमच्या मोबाईलवर प्ले स्टोअर मध्ये जाऊन तुम्ही गो ग्रीन कॅब सर्व्हिस ॲप डाऊनलोड करा. डाऊनलोड केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल टाका. लगेच तिथे तुम्हाला ऑप्शन येईल कुठे जायचं आहे. त्या संदर्भात माहिती भरा तुम्हाला काही मिनिटातच सेवा मिळेल अतिशय जलद आणि चांगली सेवा तुम्हाला ‘गो ग्रीन कॅब च्या माध्यमातून मिळेल.

Leave a comment

Call Now
Download Now