Nashik : #ElectricCab #GoGreen #Pollution वाढते प्रदूषण रोखण्यासाठी जगभरात इलेक्ट्रिक कारच्या वापरावर भर दिला जातोय. नाशकातही तीन महिलांनी यासाठी पुढाकार घेत शहरात पहिली इलेक्ट्रिक कॅब सेवा ‘गो ग्रीन’ या नावाने सुरू केली आहे. इंधनावर धावणाऱ्या सध्याच्या सेवांपेक्षा याचे भाडेही किमान २५ टक्के कमी असणार आहे.